मराठी साहित्य आणि इतर बरंच काही ....
12K subscribers
40 photos
16 videos
32 links
मराठीतील सर्वोत्तम साहित्य, ललित, पुस्तके

इतर अपडेट्स

Promotion: @dappu
Download Telegram
*नव्या वर्षाचे स्वागत ग्रंथ भेट देऊन करुया!*
सप्रेम नमस्कार!
आपल्या मित्रमंडळींना येणाऱ्या नव्या वर्षाची थोडी आगळीवेगळी भेट द्या! या प्रसंगी डॉ.नरेंद्र दाभोलकर यांची पुस्तके भेट द्यावीत असे आवाहन आम्ही करत आहोत.
*11 पुस्तके फक्त Rs. 200/- मध्ये घरपोच* (postal charges included)
*पुस्तकांसाठी संपर्क :*
सुहास येरोडकर 9970174628
संजय गलगले 9834158208
---------------------------
तुम्हाला हुशार बनायचे असेल ते इथले जोक्स वाचा...



कुणावर इम्प्रेशन पाडायचे असेल तर इथले जोक त्यांना फॉरवर्ड करा,,,




आणि कुणाचे लाइफटाईमसाठी भले करायचे असेल तर त्यांना इथे ऍड करा.



हसत रहा, सुखी रहा.
😂😂😍😂🤣😝😅😅😝😜🤣😄😄
गावकरी : काय रे गावच्या यात्रेला येतोस का गावी?

नोकरीवाला : नाय हो! रजा जास्त झाल्यात पहिल्या दिवशी येईल, नंतर जमेल असे वाटत नाही.

😩😩😩😩😩😩😩

गावकरी : काय रे! होळीला येतोयस का गावी?

नोकरीवाला : पोरांना सुट्टी नाय हो! उगीच शाळा कशाला बुडवायची.

😩😩😩😩😩😩😩

गावकरी : काय रे! दसऱ्याला येतोयस का गावी?

नोकरीवाला : नाय हो! तब्येत बरी नाय नाय जमणार.

😩😩😩😩😩😩😩

गावकरी : काय रे! दिवाळीला येतोयस का गावी?

नोकरीवाला : आलो असतो पण ऑफिस मध्ये एकटाच आहे.

😩😩😩😩😩😩😩

गावकरी : काय रे! या वर्षी कुणाच्याच लग्नाला आलास नाही?

नोकरीवाला : आई-बाबा आहेत ना ही पण म्हणाली सगळीच कशाला, मग नाही आलो.

😩😩😩😩😩😩😩

गावकरी : अरे! त्या दिवशी मयतावर आलास नाही?

नोकरीवाला : निघालो होतो पण ट्रॅफिक इतकी होती की, मौत भेटलीच नसती.

😩😩😩😩😩😩😩

गावकरी : अरे! यंदा आवणीला येशील ना?

नोकरीवाला : साहेबानी सांगितलय, रविवारी पण कामावर यायला लागेल.

😩😩😩😩😩😩😩

गावकरी (फोनवरुन) :
अरे! ऐकलस, काय ! तुमच्या जमीनीवरुन रेल्वे जातआहे रेल्वेमध्ये गेलेल्या जमिनींच्या नोटीसा आल्यात, पंधरा दिवसात पैसे भेटणार आहेत पण तुझी सही साठी यायला जमेल काय तुला ? तुझा दादा पण यायला निघालाय?

नोकरीवाला :
दहा मिनिटांत ऑफिस मधुन निघतो, एकटाच आलो तर चालेल का सगळे येऊत! दादाला सांगा दोन तासात पोहोचतो आणि हो मोठ्या बाबांना विचारा घरी येऊ का ? डायरेक्ट तहसील ऑफिसला येऊ. वाटल्यास मी पंधरा दिवसाची रजा टाकूनच येतो? पुर्ण काम झाल्यावरच परत जाईल..
😭😄😂😱😇


'विनोदाचा भाग बाजूला ठेवा पण ही आजची सत्य परिस्थिती आहे.'

लोकांमध्ये Professionalism आणि स्वार्थ इतका वाढलाय की आपलं गाव, गावपण, जुन्या रीती, भुतकाळ, परंपरा गुंडाळून ठेवल्या जात आहेत.
Nitin Kolhe ह्यांचा वॉलवरून साभार

🙏🏻
लव्ह बाईट ❤️... नेमकाच व्हॅलेंटाईन आठवडा संपला! १५ तारखेला एक तरूण दवाखान्यात आला होता. उंचापुरा, गोरापान... दाढी वगैरे कोरलेली! त्याचा नंबर आला तरी तो काही मध्ये यायला तयार नव्हता. उगाच उकडून तिकडे फिरत होता, मागून येणाऱ्या पेशंटला तो 'पुढे जा' म्हणून जागा देत होता. अनुभवानं पेशंट ओळखता येतो, काहीतरी वेगळं आहे हे लक्षात आलं आणि सिक्युरिटी ला खूणावून सांगितलं, त्यांना मध्ये पाठवा.
     तो मध्ये आला आणि विचारलं,
     "काय झालंय?"
     माझ्या बाजूला दोन इंटर्न डॉक्टर मुली बसल्या होत्या. खरंतर पोरी बघून तो गडबडला होता, तो त्यांना लाजत होता. त्यांच्यामुळेच तो इतका वेळ बाहेर घुटमळत होता.
     "इथे सगळेच डॉक्टर आहेत, काय झालंय बोला?" जरा मोठ्याने विचारले तसं त्याची मान जवळ करत, अगदीच हळू आवाजात मला एकट्यालाच ऐकू येईल अशा आवाजात म्हणाला,
     "सर, गर्लफ्रेंड चावलीय!"
     माझा लिहीता हात क्षणभरासाठी थबकला!
     त्याच्या मानेवर वरच्या आणि खालच्या मिळून जवळपास आठ-नऊ दातांची गोलाकार, लालभडक  रक्ताळलेली जखम दिसत होती.
       मांजर, कुत्रा किंवा इतर कुठला प्राणी चावल्यास काही गरज नसते पण माणूस चावल्यास काही लीगला गोष्टी कराव्या लागतात. तो म्हणाला,
      "सर, 'भावनेच्या भरात' चुकून झालं असावं तिच्याकडून. लव्ह बाईट ❤️ होता तो! मला ट्रीटमेंट द्या आणि प्लीज तिचं नाव कुठं येऊ देऊ नका!"
       बिचारा प्रेमात अखंड बुडालेला असावा. कुत्रा चावल्यावर, मांजर चावल्यावर, माकड चावल्यावर, घुस किंवा उंदीर चावल्यावर... गर्लफ्रेंड चावल्यावर सारखीच ट्रीटमेंट असते!
       चांगले दोन-तीन इंजेक्शन आणि औषधोपचार घेऊन तो आला आणि निघताना Thank you म्हणून परत निघाला. त्याला काहीतरी आठवलं असावं. दोन पावलं पुढे जाऊन माघारी फिरला आणि म्हणाला,
       "सर काही पथ्ये वगैरे?"
       'आता गर्लफ्रेंड चावल्यावर काय पथ्ये पाळायची हेही मीच सांगू का?' असा विचार मनात येऊन हात नकळत जोडले गेले.

अशा पद्धतीने आमचा व्हॅलेंटाईन आठवड्याचा शेवट झाला.
ते क्राईम पेट्रोल च्या शेवटी सांगतात तसं 'सतर्क रहे, सुरक्षित रहे'  सारखं मलाही म्हणावं वाटत आहे...काळजी घ्या, सुरक्षित राहा!
कोणापासून ते आता तुम्हाला सांगायची गरज नाही😀

डॉ. प्रकाश कोयडे
*शिवजयंती स्पेशल*
*NEW SONG*
🚩🚩🚩🚩🚩🚩

https://youtu.be/AM45BKO_WSE

*• माझ्या शिवबाच्या शौर्या पुढं*
*• गायक:- हृतिक गंगावणे(फॅन झालो ग फेम)*
*•गीतकार :- इंजी. सचिन प्रकाशराव भद्रे ( बापाचा कालचा रुबाब फेम )*
*•संगीत :- DJ SANDESH BLD*


🙏 PLEASE LIKE COMMENT SHARE AND SUBSCRIBE🙏🙏
“भारतीय समाजात काय बदल व्हावा असं वाटतं?”असं कुणी मला जेव्हा विचारतं तेव्हा माझं ठरलेलं उत्तर असतं,”सिविक सेन्स विकसित व्हावा..

सर्वसामान्य भारतीय माणूस हा तसा कुटूंबवत्सल-प्रेमळ असल्यानं सार्वजनिक ठिकाणी अधिक सजग असायला हवा पण कदाचित आपल्याकडं अघळपघळपणा असल्यानं नेमकं तसा तो नसतो..

सरसकट सगळेच हमरीतुमरीवर येतात किंवा लागलीच ‘भ’ ची बाराखडी म्हणतात असं नाही किंबहुना अनेकदा त्याचा तसा उद्देशही नसतो पण सामाजिक जीवनात ज्या साध्या साध्या गोष्टीचं ‘भान’ राखायला हवं तो ते राखत नाही..

कुठंही खाकरणं-थुंकणं-शिंकरणं-लघुशंकेस थांबणं हा फार उथळ प्रकार पण प्रवासात-थांब्यावर-कार्यालयात-दवाखान्यात लोकं अनेकदा आक्षेपार्ह वर्तन करतात आणि हे चुकीचं आहे हे त्यांना कळतही नाही..

भिन्नलिंगी लोक विशेषत: यातले पुरूष मंडळी एकमेकांकडं बघणं हा साधा प्रकारही ॲाकवर्ड करून टाकतात..

पहिल्याच भेटीत खाजगी चौकश्या करणं-जातपात शोधणं यापासून ते तितकीशी मोकळीक आली नसतांनाही थेट टिपण्णी करणं हे आपल्याकडं सर्रास घडतं..

जेन्युईन काळजी असते,प्रेम-जिव्हाळा वाटतो त्यामुळं कधीतरी ठिके पण अनेकजण प्रत्येक भेटीत लग्नाळू लोकांना ‘कधी?’ आणि नुकतंच लग्न झालेल्यांना ‘मग कधी?’ विचारून अक्षरश: भंडावून सोडतात..

अपरिहार्य कारणानं पाय कापावा लागलेल्या रुग्णाशी बोलतांना लोकं “अरेरे तु तर आता अधूच झाला-कृत्रिम पाय बसवता येईल पण नॅचरल ते नॅचरल-टचवूड आपलं सगळं शाबूत आहे राव” अश्या चर्चा करतात..

अपघातामुळं हॅास्पिटलाईज झालेल्या रुग्णाशी तिथंच “अपघात नेमका झाला कसा?कुणाची चूक होती?” यावर सपट परिवार महाचर्चा करत बसतात..

रक्तदाब-मधुमेह असलेल्यांसाठी तर सगळेच काय खावं-प्यावं यापासून योगा-औषधांबद्दल अर्धवट-अस्थायी-अशास्त्रीय अश्या प्रकारची माहिती-सुचना-ज्ञान प्रसारित करत असतात..

मणुष्यबळ हे खरं तर आपलं ॲसेट,कुणी रस्त्यात पडलं तरी दहा लोक धावून येतात ही अत्यंत महत्वाची आणि सकारात्मक बाब..

सगळ्यांनीच सगळीकडं वैयक्तिक-नैतिक-सामाजिक भान पाळावंच असंही नाही तसं शक्यही होणार नाही..
अघळपघळपणा हा आपला स्थायीभाव आहे तो वाईटही नाही पण “काय बोलावं यापेक्षा काय बोलू नये” याकडं मात्र सगळ्यांनीच थोडं तरी लक्ष्य द्यायला हवं !

#Doctors_Diary
प्रज्ञावंत
आज येस बँकेतून कॉल आला होता

त्यावर एक बाई त्यांच्या बँकेत अकाउंट उघडण्याविषयी हिंदीत बोलत होती, तिला म्हटलं मराठीत बोल तर म्हणते येत नाही, मग मी पण शिकून घे आधी अन मग मला कॉल लाव म्हणालो आणि कॉल कट केला


मराठी बोला
मराठी बोलायला लावा
मराठी जतन करा
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
आधीचे चलचित्र दिसत नाही अशी काहींची तक्रार होती म्हणून आता त्यात सूक्ष्म बदल करून पुन्हा पाठवत आहे, आता दिसेल अशी आशा आहे
धन्यवाद


आजच्या दिवसाचे औचित्य साधून अनेकांनी देवनागरी लिपीत टाईप करायचा संकल्प करून त्याची सुरुवातसुद्धा केलेली आहे त्या सर्वांचे अभिनंदन आणि शुभेच्छा.. 🙏🙏


आम्ही सुरुवात केली, तुम्ही कधी करणार ?? ☺️☺️


टीप: मोबाईल/लॅपटॉपवर मराठी टायपिंग विषयी काही अडचण असल्यास कमेंट्स सेक्शनमध्ये विचारू शकता
मुंबई झोन मध्ये GST विभागात थेट इन्स्पेक्टर म्हणून भरती झालेली लिस्ट बघा.
ह्यात ३९७ पैकी जेमतेम १० मराठी नावे आहेत...आणि ही टक्केवारीसुध्दा गेल्या दहा वर्षांतील सर्वोत्तम असावी इतकी वाईट अवस्था आहे..

ह्यात केवळ मीणा आडनावाची किंवा अभिषेक नावाची मुलेसुध्दा एकूण मराठी मुलांपेक्षा जास्त आहेत !

काय परिस्थिती आहे बघा ही आपल्या मुंबईमध्ये..
ह्याकडे कोणाचेही लक्ष नाही, नेते शेण खाण्यात व्यस्त आहेत, जनता मंदिरात खुश आहे आणि तरुणाई आरक्षणाच्या मृगजळ मागे धावतेय..

कसला मराठी बाणा आणि कसले काय..!

अत्यंत वेदनादायक चित्र आहे....!!