MPSC
323K subscribers
347 photos
37 files
1.72K links
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office
Download Telegram
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2019-पोलीस उपनिरीक्षक करीताच्या पुणे व कोल्हापूर केंद्रावरील अनुक्रमे दिनांक 1 व 2 डिसेंबर,2021 व दिनांक 2 डिसेंबर, 2021 रोजी आयोजित शारीरिक चाचणी व मुलाखती अवकाळी पावसामुळे पुढे ढकलण्यात येत आहेत. शारीरिक चाचणी व मुलाखतींचा सुधारित कार्यक्रम स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येत आहे.
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षेचा सुधारित अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. प्रस्तुत अभ्यासक्रमामध्ये उद्योग निरीक्षक व विमा संचालनालयातील तांत्रिक सहायक या संवर्गाच्या मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम अंतर्भूत करण्यात आला आहे.
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2022 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
MPSC pinned «महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2022 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.»
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019 करीता पुणे, नाशिक व औरंगाबाद जिल्हा केंद्रावरील पुढील टप्प्यातील मुलाखती दिनांक 13 डिसेंबर 2021 रोजीपासून आयोजित करण्यात येत आहेत.
अवर सचिव,विधी संवर्गाकरीता प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमधील (जाहिरात क्रमांक 258/2021) पदसंख्येतील बदलासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, गट-अ संवर्गातील 22 पदांच्या भरतीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
विमा उपसंचालक, सामान्य राज्यसेवा, गट-अ संवर्गाकरीता प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमधील (जाहिरात क्रमांक 10/2020) अर्हतेमधील बदलासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
विमा सहायक संचालक, सामान्य राज्यसेवा, गट-अ संवर्गाकरीता प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमधील (जाहिरात क्रमांक 11/2020) अर्हतेमधील बदलासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019 करीता पुणे, नाशिक व औरंगाबाद जिल्हा केंद्रावर दिनांक 13 डिसेंबर,2021 रोजीपासून आयोजित दुसऱ्या टप्प्यातील मुलाखतीचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.