MPSC
322K subscribers
347 photos
37 files
1.71K links
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office
Download Telegram
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019 करीता पुणे जिल्हा केंद्रावर दिनांक 13 डिसेंबर, 2021 ते 16 डिसेंबर, 2021 या कालावधीत आयोजित मुलाखतीपैकी एका मुलाखत समितीकडील मुलाखती मा. सदस्य, मलोआ यांच्या प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव पुढे ढकलण्यात येत आहेत. मुलाखतीचा सुधारित कार्यक्रम स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.
जाहिरात क्रमांक 255/2021 औषध निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन, गट-ब या संवर्गाची जाहिरात व भरतीप्रक्रिया स्थगित करण्यात येत आहे. याबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
महाराष्ट्र गट-क सेवा परीक्षेची सुधारित परीक्षा योजना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
आयोगामार्फत दिनांक १० डिसेंबर, २०२१ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा-२०२० च्या अधिसूचनेसंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
आयोगामार्फत दिनांक १८ डिसेंबर, २०२१ रोजी नियोजित महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२० करिता लेखनिक आणि/अथवा अनुग्रह कालावधी घेण्याची परवानगी देण्यात आलेल्या दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या आस्थापनेवरील जीवरसायनशास्त्रज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब संवर्गातील १६ पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (२६३/२०२१) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाअंतर्गत नव्याने निर्माण करण्यात आलेल्या अलिबाग व सातारा या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयांच्या आस्थापनेवरील जीवरसायनशास्त्रज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब संवर्गातील पद भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (क्रमांक २६४-२६५/२०२१) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019 करीता पुणे, नाशिक, औरंगाबाद व मुंबई जिल्हा केंद्रावर दिनांक 20 डिसेंबर, 2021 रोजीपासून आयोजित तिसऱ्या टप्प्यातील मुलाखतीचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
दिनांक 13 ते 16 डिसेंबर, 2021 या कालावधीतील पुणे जिल्हा केंद्रावरील पुढे ढकलण्यात आलेल्या उमेदवारांचा समावेश सुधारित मुलाखत कार्यक्रमात करण्यात आलेला आहे.
प्राध्यापक, मज्जातंतुशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, गट अ ( जाहिरात क्रमांक 10/2021) संवर्गाचा मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.