MPSC Mantra
29.6K subscribers
14K photos
28 videos
3.73K files
2.34K links
Best Channel for MPSC Aspirants..
_____________
visit our website 👇
www.mpscmantra.com
____________
Download Telegram
प्राणी सृष्टी (Kingdoms Animalia)




#combinemainsseries
#mpsc
#simplifiedvishleshan



Join @SahyadriIAS
पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांनी स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती ? (राज्यसेवा पूर्व परीक्षा 2015)
1) आर्य महिला समाज
2) भारत महिला परिषद
3) द मुस्लीम विमेन्स असोसिएशन
4) भारत स्त्री महामंडळ

उत्तरः 4

स्पष्टीकरण

महिलांशी संबंधित संस्था :-

भारत स्त्री महामंडळ :-

स्थापना : 1910 (अलाहाबाद)

संस्थापक : सरला देवी चौधरी

भारतातील पहिली स्त्रियांनी स्त्रियांसाठी उभारलेली संस्था

उद्देशः महिलांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे

भारत महिला परिषद :-

संस्थापक : रमाबाई रानडे

ठिकाण : मुंबई

उद्देश : सामाजिक विषयांच्या चर्चेसाठी एक मंच प्रदान करणे.

ही परिषद राष्ट्रीय सामाजिक परिषदेचा भाग होती.

वूमेन्स इंडियन असोसिएशन :-

संस्थापक : डोरोथी जिनाराजादासा (Dorothy Jinarajadasa)

स्थापना : 1915

पहिल्या अध्यक्षा : अॅनी बेझंट

मुख्य कार्य : शैक्षणिक

भारतीय राष्ट्रीय महिला परिषद :-

The National Council of Women for India

स्थापना : 1925

आंतरराष्ट्रीय महिला परिषदेशी संलग्न होती.

मेहरीबाई टाटा (दोराब टाटाची पत्नी) यांनी यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

अखिल भारतीय महिला परिषद :-

The All-India Women's Conference

संस्थापक : मागरिट कजिन

स्थापना : जानेवारी 1927 (पुणे)

उद्देश : महिला आणि मुलांचे शिक्षण आणि सामाजिक कल्याणासाठी प्रोत्साहन देणे.

आर्य महिला समाज :-

संस्थापक : पंडिता रमाबाई

सहकार्य : न्या. रानडे व रमाबाई रानडे

स्थापना : 1882 (पुणे)

या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांच्या स्थितीबद्दल जागृती केली.

#simplifiedvishleshan

जॉईन
@SahyadriIAS
स्त्री सेविका संघ

पुण्यातील काँग्रेस विचारधारेच्या स्त्रियांनी  'महाराष्ट्र भगिनी मंडळ' ही संस्था स्थापन केला होती.

पंरतु ब्रिटीश सरकारने ती बेकायदेशीर ठरवून या संघटनेला दडपून टाकले. त्यामुळे 1935 मधील काँग्रेस मधील स्त्रियांनी 'स्त्री सेविका ' नावाची संघटना स्थापन केली.

या संघटनेच्या सभासदांची संख्या, संघटनेचे कार्यक्षेत्र आणि त्यांची ताकद मर्यादीत होती.

फैजपूरच्या कॉंग्रेसच्या अधिवेशनासाठी स्त्री सेविका संघातील स्त्रियांनी प्रेमा कंटक यांच्या मार्गदर्शनाखाली स्वंयसेविकांची जबाबदारी पार पाडली.(PYQ)

या माध्यमातून संघटित होऊ लागलेल्या स्त्री शक्तीचे प्रदर्शन त्यांच्या संघटीत व शिस्तपूर्ण कामामुळे कॉंग्रेसच्या फैजपूर अधिवेशनात झाले.

#simplifiedvishleshan

join @SahyadriIAS